Sawal Jawab Song | Chandramukhi | Marathi Song 2022 | Ajay - Atul | Amruta Khanvilkar, Prajakta Mali

preview_player
Показать описание
Presenting biggest Marathi song of this season "Sawal Jawab सवाल जवाब" from most awaited Marathi movie 2022 "Chandramukhi" sung by Madhura Datar, Priyanka Barve, Vishvajeet Borvankar and composed by Ajay - Atul. Starring Amruta Khanvilkar, Addinath M Kothare. Exclusively only on @EverestMarathi

Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.

Popular Marathi Videos

♪ Song Available on ♪

Set 'Sawal Jawab' song as your Mobile Callertune (India Only)
Airtel Subscribers Dial 5432118296526
Vodafone Users Dial 53713229497
Idea Users Dial 5678913229497
BSNL (South / East) Users sms BT 13229497 To 56700

Movie Credits:
Directed By Prasad Oak
Produced by: Planet Marathi, Golden Ratio Films
Producer: Akshay Bardapurkar, Abhayanand Singh, Piiyush Singh, Saurabh Gupta
Co-Produced by Flying Dragon Entertainment, Lightwithin Entertainment, Yaelstar Films
Starring: Amruta Khanvilkar, Addinath M Kothare, Mrunmayee Deshpande, Mohan Agashe, Rajendra Shisatkar, Samir Choughule
Presenter: Creative Viibe Productions, Santosh Kher, Tejaswini Pandit
Screenplay & Dialogues : Chinmay Deepak Mandlekar
DOP: Sanjay Memane
Choreographer: Dipali Vichare

Credits:
Music Composed, Arranged, Conducted & Produced by Ajay-Atul
Lyrics: Guru Thakur
Singers: Madhura Datar, Priyanka Barve, Vishvajeet Borvankar
Recorded & Mixed by Vijay Dayal @ YRF studios
Assistant Sound Engineer : Chinmay Mestry
Mastered by Gethin John at Hafod Mastering (Wales)
Dholki - Krishna Musale, SatyajeetJamsandekar
Percussion - Prarap Rath, Ajay Gogavale
Halgi - Akshay Avahale
Harmoniyam - Aaditya Oak, Amit Padhye
Chorus - Aarohi Mhatre, Rucha Soman, Aditi Kulkarni, Manasi Paranjpe, Deepanshi Nagar, Sonal Naik
Music Label: Everest Entertainment

Lyrics
सवाल- 1 ( आईचा )
नर नारीचे मिलन घडता
जीव नवा ये जन्माला
तिन्हीत्रिकाळी सत्य असेहे
ठाऊक अवघ्या जगताला ||

अगं सांग तु ऐशा मिलनाविना
जन्म कुणाचा झाला गं
अन कुणा नारीनं कसा अन कधी
चमत्कार हा केला गं ||

जवाब -1 ( लेकीचा )
अहो नसे नारी ती ऐरी गैरी
आदीशक्ती ह्या जगती गं
सांब शिवाची अर्धांगी तीज
माय पार्वती म्हणती गं ||

अहो अंग मलातून बालक रचिला
चमत्कार तो गणपती
अन त्याच गणाची आज थोरवी
कार्यारंभी गाती गं ||

सवाल -2 ( लेकीचा )
सदैव असते सख्या संग जरी
बिलगून त्याला राही गं
अंधाराचं बोट धरूनी
कुणा भेटण्या जाई गं ||

देती दुनिया तरी दाखला
या दोघांच्या पिर्तीचा
अंधाराचं गुपित सांग तू
सवाल करते नीतीचा ||

जवाब -2 ( आईचा )
सोबत असते तरी न दिसते
गोष्ट ही न्याऱ्या ढंगाची
अंघारी त्या विरुन जाते
सखी सावळ्या रंगाची ||

युगायुगांचे सत्य असे, ही
सखी सख्या विन नसते गं
शरीर म्हणजे सखा तयाची
सखी सावली असते गं ||

सवाल ( वडिलांचा ) & ( आईचा )

अग आभाळाहून विशाल भारी
कधी लोण्याहुन मउसुत गं
फिक्की पडती चंदनकाडी
झिजनं‌ त्याचं अद्भुत गं ||

डोईवरली होई सावली
कधी पाठीचा ताठ कना
कधी प्रसंगी तांडव करुनी
होई भोळा सांब पुना ||

देवदानवांनाही होता
प्रत्येकाला असतो गं
नकोस शोधू पुराण पोथ्या
घराघरातून दिसतो गं ||

जवाब ( लेकीचा )

किती वर्णू गं महिमा त्याचा
त्याच्या पायी घडले गं
हरवून जाता त्याची सावली
जगी एकटी पडले गं ||

लयमोलाचा ऐवज असतो
पुन्हा कधी ना मिळतो गं
उमगायाला सोपी आई
बाप कुणा ना कळतो गं ||

जन्म घेई जे त्या साऱ्यावर
त्त्याच्या गुनांची छाप दिसे
सवाल होता फक्कड ज्याचा
जवाब केवळ बाप असे ||

Enjoy & Stay connected with us!

#MarathiSong2022 #AjayAtul #Chandramukhi
Рекомендации по теме
Комментарии
Автор

Watch song "बाई गं Bai Ga" from movie "Chandramukhi". Music by Ajay-Atul.

EverestMarathi
Автор

लयमोलाचा ऐवज असतो
पुन्हा कधी ना मिळतो गं
उमगायाला सोपी आई
बाप कुणा ना कळतो गं ||

जन्म घेई जे त्या साऱ्यावर
त्त्याच्या गुनांची छाप दिसे
सवाल होता फक्कड ज्याचा
जवाब केवळ बाप असे || जबर्दस्त❤❤❤❤

amoldange
Автор

5:09 बापाच वर्णन एवढ्या सुंदर शब्दात ऐकून डोळ्यात पाणी आलं❤️.
आई-बाप जपा, एकदा वेळ गिली की पुन्हा टाहो फुडून उपयोग नाही🙏🏻♥️.

vishvadeshmukh
Автор

वा !!
गुरू ठाकूर, अजय अतुल, प्राजक्ता, अमृता, आणि शेवटी प्रसाद ओक.
अप्रतिम कलाकृती निर्माण केली आपण.

vitthalsabale
Автор

प्रसाद ओक यांचे खूप खूप आभार.... कलाकारांची उत्तम निवड करून त्यांना त्यांच्या परीची कामे देऊन मराठी सिनेसृष्टीत असा हा दर्जेदार हा चित्रपट घडवला. अभ्यासू अभिनेत्याने आणि दिग्दर्शकाने केलेल्या अभ्यासाचा हा निकाल.... धन्यवाद.

jadhavpriyanka
Автор

मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ पुन्हा सुरू झाला आहे आज जुन्या चित्रपटाची आठवण झाली आज पुन्हा सवाल जवाब पाहून जयश्री गडकर यांची आठवण आली ❤️ प्रसाद ओकसाहेब खूप खूप धन्यवाद एवढा सुंदर चित्रपट आपल्याला देत आहे🙏

sachinjamdar
Автор

अप्रतिम अगदी जुन्या जमान्यात गेल्या सारखे वाटले

umeshsamant
Автор

अगदी मनापासून वाट बघतोय सिनेमाची, अवर्णनीय...!!!
अंगावर काटा आला, डोळ्यात पाणी आल, आई आणि वडिलांचा सवाल जवाब ऐकून...!!!
एकच नंबर, दर्जा, नादखुळा...!!!

purushottamsolage
Автор

जुन्या मराठी संगीताचा सुवर्णकाळ पुन्हा सिने सृष्टी गोल आहे आनंदमय स्वागत

pradipgupte
Автор

अंगावर काटा आला खरच याला म्हणतात मराठी संस्कृति।। आताच्या लावण्या म्हणजे यमाश्या करून ठेवलाय।। नमन या लावणीला

pandurangjadhavpatil
Автор

अप्रतिम कलाकृती...शेवटी डोळ्याला पाणी आले....खूप छान आज पुन्हा जुन्या मराठी सिनेसृष्टीत परतल्या सारखे वाटले... ❤️

dipaligolhar
Автор

खरंच खूप अर्थपूर्ण असतात हे सवाल जवाब. जुन्या शाहिरानी खूपच छान कवण करून जुन्या मराठी चित्रपटा मधून आपल्या ला लावण्या चा नजराणा भेट केला आहे. तसेच आत्ताच्या अभिनेत्रींनी ही ही परंपरा अशीच जोपासली पाहिजे.

sanjaysalunke
Автор

खऱ्या अर्थाने मराठी चित्रपट सृष्टीच नाही तर, मराठी लोकसंस्कृतीचाच सुवर्णकाळ पुन्हा अवतरला असं नक्की वाटतय. गुरू ठाकूर आणि अजय-अतुल हे वेगळं रसायन आपल्या कार्याला🙏

jaykhade
Автор

शेवटच्या ओळी काळजाला भिडतात अगदी.... प्राजक्ताचा attitude आणि अमृताची तळमळ केवळ सुंदर सादरीकरण 👏👏👏👏

shabdalu
Автор

शेवटी डोळ्यांतले अश्रू अनावर झाले! अप्रतिम अभिनय, मनाला भेदून जाणारे शब्द आणि एक अतिशय सुंदर प्रस्तुती 🤍

rutujachaudhary
Автор

बऱ्याच वर्षानंतर सवाल जवाब ची लावणी ऐकून आत्मिक आनंद झाला ह्या कर्न कर्कश गाण्यांच्या बाजरात अशी लावणी ऐकण्यास मिळणे म्हणजे पर्वणी च म्हणावी
धन्यवाद ! चंद्रमुखी टीम

नीलकंठकरडे
Автор

बापाविषयी लेकीच्या भावना उत्तम सादर केल्यात..अमृता आणि प्राजक्ता खूप सुरेख परफॉर्मन्स... hats off टीम चंद्रमुखी..❤️

digamberkharat
Автор

मराठी इंडस्ट्रीने पुन्हा एकदा कात टाकल्यासारखे वाटतेय, , , आणि महाराष्ट्रीयन लावणी जिवंत ठेवल्याबद्दल प्रसाद ओक साहेबांचे खूप खूप आभार, , , ,
नसता मला तर घोरच पडला होता की आपली संस्कृती बुडते की काय, , ,
पण प्रसाद दा आणि या चित्रपटासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा खुप खुप आभार

anildange
Автор

खरंच पुन्हा मराठी चित्रपटाचा सुवर्ण काळ बघण्याची संधी आजच्या पिढी ला मिळाली प्रसाद ओक, गुरु ठाकूर आणि अजय अतुल या सर्व टीम च मना पासून आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻

tanumore
Автор

प्राजक्ता माळी हिला सरस्वती चां फार मोठ वरदान आहे

parimalpatil