Kaprdikeshwar I Otur I 2019

preview_player
Показать описание
कपर्दिकेश्‍वर हे प्राचीन स्वयंभू शिवालय आहे. जुन्नर तालुक्यातील प्राचीन मंदिरा पैकी हे एक मंदिर आहे.मंदिरामध्ये सुंदर अशी महादेवाची पिंड आहे. श्री क्षेत्र कपर्दिकेश्वर आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे गुरु जगदगुरू श्री चैतन्य महाराज यांच्या समाधीने पावन झालेल्या या ओतूर तीर्थक्षेत्र. १९५३ साली गावकऱ्यांनी एकत्र येऊन कपर्दीकेश्वर देवस्थान ट्रस्टची स्थापना केली आणि १९५८ साली मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला.तसेच चैतन्यस्वामी समाधी स्थानावर मंदिर बंधण्यात आले. महाशिवरात्रीला तसेच श्रावणमासातील प्रत्येक सोमवारी दूरवरून व परिसरातील भाविक मोठ्या संख्येत या तीर्थस्थळी येवून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. बाबाजी ऊर्फ केशव चैतन्य महाराजांनी गुरुवार वैशाख शुद्ध द्वादशी सन १५७१ रोजी वयाच्या ४७ व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. ही समाधी म्हणजे दगड-वीटा मातीने बांधलेली नसून, नैसर्गिकरीत्या त्यांच्या अंगावर मातीचे वारुळ झाले. शेकडो वर्षे होऊनही हे वारुळ जसे पूर्वी होते तसेच आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री कपर्दिकेश्‍वर देवधर्म संस्था दर वर्षी श्रावण महिन्यात प्रत्येक श्रावणी सोमवारी यात्रा भरविते. या यात्रेचे वैशिष्ट्य असे आहे, की या मूळ शिवलिंगावर कोरड्या तांदळाच्या सुमारे ५ फूट उंचीच्या उभ्या लिंगावर आधारलेल्या पिंडी असतात. पहिल्या श्रावणी सोमवारी १ दुसर्‍यात, २ तिसर्‍यात ३ चौथा व पाचवा असल्यास ५ पिंडी होतात.
Рекомендации по теме