Pt Uday Bhawalkar @ LKSS.19

preview_player
Показать описание
अभिजात म्युझिक फोरम आयोजित लोणावळा खंडाळा संगीत महोत्सव हे तीन दिवसीय निवासी संगीत संमेलन (२० – २२ सप्टेंबर) अनेक कारणांनी संस्मरणीय झाले,

ज्येष्ठ, अनुभवी आणि युवा असा समतोल साधलेल्या ३२ कलाकारांचा गायन-वादन-नृत्याचा अविष्कार, त्याला संगीत या एकमेव उद्देशाने एकत्र जमलेल्या ४०० रसिक श्रोत्यांची दाद, लोणावळ्याला मनःशांती केंद्रामध्ये कलाकारांच्या सान्निध्यात तीन दिवस मुक्काम, सुसंवादामुळे कलाकार आणि श्रोते यांच्यामधले कमी झालेले अंतर असे संमेलन आयोजकांचे उद्देश सफल झाले. वेगवेगळ्या शहरांमध्ये अनेक शास्त्रीय संगीत संमेलने अनेक होत असतात. एका वेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या निवासी संगीत संमेलनामध्ये श्रोते वेगवेगळ्या गावामधून येतात इतर सर्व व्यवधाने बाजुला ठेवली जातात आणि पूर्ण लक्ष संगीत ऐकण्यावरच केंद्रित केले जाते. सर्वांचीच दैनंदिन व्यावधाने अनेक असतात, त्याशिवाय आपले लक्ष विचलित होण्यासाठी आजूबाजूला अनेक संधी उपलब्ध असतात. त्याला छेद देण्यासाठी निवासी संगीत संमेलन हा उत्कृष्ट पर्याय आहे.

पहिला दिवस संस्मरणीय झाला पं उदय भवाळकर यांच्या धृपद गायनामुळे. जयजयवंती रागामध्ये २० मिनिटाची आलापी करताना त्यांचा स्वरलगाव, तीनही सप्तकामध्ये फिरणारा आवाज ऐकण्यासारखा होता. प्रताप आव्हाड यांच्या पखवाजच्या साथीने चौतालात गायलेल्या रचनेनंतर त्यांनी सोहोनी रागातील दहा मात्रांमधली रचना “प्रथम आदी शिव शक्ती” गायली. धृपद गायकीवर स्वतःच्या विचारांची मोहोर उठवून लोकप्रिय करण्याचे श्रेय भवाळकर याना जाते कारण त्या गायनामध्ये त्यांनी आणलेली तरलता.
Рекомендации по теме
Комментарии
Автор

Thank you so much Wishwas Kaka for this wonderful sharing 🙏🙏🙏🙏

chintanupadhyay
Автор

Please write your introduction in English.

sskrishna
Автор

Cannot forget this excellent performance.. Jayjayvanti I guess

ArunSatheArchival
Автор

Unfortunately, recording does complete injustice to his performance, especially towards the end

Angajable